• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निवडणूक सामान्य निरीक्षकांकडून आढावा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

Our Media by Our Media
April 5, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
अकोला
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.4: निवडणूक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था आणि योग्य वातावरण राखतानाच, विविध उपक्रमांतून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी आज येथे दिले. अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूकविषयक कामकाजाबाबत नियोजनभवन येथे आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण, निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.  निवडणुकीसाठी यंत्रणेकडून झालेली कार्यवाही, सर्व मतदान केंद्रांवरील सुविधा, विविध निगराणी पथके, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, सी-व्हिजील, प्राप्त तक्रारी, स्वीप उपक्रम आदी विविध बाबींचा आढावा सामान्य निरीक्षकांनी यावेळी घेतला.

श्री. जाडोन म्हणाले की, निवडणूक मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध प्रयत्न व्हावेत. शहरी भागात लक्ष केंद्रित करावे. गत निवडणूकीत ज्या बुथवर मतदानाचे प्रमाण कमी होते, अशी केंद्रे निवडून कमी मतदानाची कारणे शोधून काढावीत. त्यानुसार भरीव जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अभिनव उपक्रम हाती घ्यावेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ते पुढे म्हणाले की, सध्याचा उन्हाळा लक्षात घेता मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा असणे आवश्यक आहे. विशेषत: आरोग्य पथके सुसज्ज असावीत. उष्माघातासारखे प्रकार घडू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणेने ‘अलर्ट मोड’वर राहावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे पालन होण्यासाठी सर्व पथकांनी समन्वय ठेवून काटेकोरपणे कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. परंडेकर यांनी सादरीकरण केले. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांचा संपर्क क्रमांक 8626058320 आणि दूरध्वनी क्रमांक (0724) 2991067 हा आहे. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांना न‍िवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास ते शासकीय व‍िश्रामगृह येथील गुलमोहर कक्ष येथे सकाळी ९ ते १० या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असतील.

Previous Post

राज्यात पुन्हा अवकाळीचा मारा

Next Post

आता ATM मध्ये UPI वापरून रोख रक्कम भरता येणार, आरबीआयची घोषणा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
rbi

आता ATM मध्ये UPI वापरून रोख रक्कम भरता येणार, आरबीआयची घोषणा

दिव्यांग विद्यालय येथे रॅलीद्वारे मतदानाबाबत जनजागृती

दिव्यांग विद्यालय येथे रॅलीद्वारे मतदानाबाबत जनजागृती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.