अकोला,दि.13: सैनिक कल्याण विभागातर्फे क वर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यात असून, त्यासाठी माजी सैनिक उमेदवारांनी दि. 3 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले आहे.
विभागाच्या विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतील 40 कल्याण संघटक, 17 वसतिगृह अधिक्षक, 1 कवायत प्रशिक्षक, 1 शारिरिक प्रशिक्षण निदेशक आदी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज करावेत. वसतिगृह अधिक्षिका या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातुन किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.