• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अंतरिम बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी : पीएम मोदी

Our Media by Our Media
February 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, अर्थकारण, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
86 1
0
पंतप्रधान
12
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केंद्रीय अंतरिम बजेट सादर केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचे हे अंतरिम बजेट असले तरी ते सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. हे बजेट विकसित भारताचे चार स्तंभ युवा, गरीब, महिला, शेतकरी यांना मजबूत करेल. हे देशाचे भविष्य घडवणारे बजेट आहे.” या बजेटमध्ये २०४७ च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची गॅरंटी आहे. त्याबद्दल निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन करतो, असेही पीएम मोदी म्हणाले.

आम्ही एक मोठे लक्ष्य ठेवतो. ते साध्य करतो आणि मग आणखी मोठे लक्ष्य ठेवतो. आम्ही गावांत आणि शहरांमध्ये गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत आणि आता आणखी २ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही २ कोटी लखपती दीदी करण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले होते, ते आता ३ कोटीपर्यंत वाढवले ​​आहे. आज ज्या नवीन आयकर योजनेची घोषणा करण्यात आली त्याचा मध्यमवर्गातील एक कोटी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील सरकारांनी अनेक दशके सर्वसामान्यांच्या डोक्यावर ही मोठी टांगती तलवार ठेवली होती, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमधील ठळक मुद्दे :-

  • प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा ३८ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असून १० लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
  • पीएम फॉर्मलायझेशन मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजनेने २.४ लाख बचत गट आणि ६० हजार व्यक्तींना क्रेडिट लिंकेजसाठी मदत केली आहे.
  • सर्व आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सेवा कवच देण्यात येणार आहे.
  • माता व बाल आरोग्य सेवेअंतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधण्यासाठी एकाच व्यापक कार्यक्रमांतर्गत आणल्या जातील.
  • सुधारित पोषण वितरण, लवकरची बालपणातील काळजी व विकासासाठी, ‘सक्षम अंगणवाडी व पोषण २.०’ अंतर्गत, अंगणवाडी केंद्रांचे अपग्रेडेशन वेगवान केले जाईल.
  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी सरकार ९ ते १४ वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास प्रोत्साहन देईल.
  • दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केला जाईल. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, पण दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी असल्याने विद्यमान योजनांवर धोरणात्मक कार्यक्रम तयार केला जाईल.
  • मध्यमवर्गीयांसाठी घरे, भाड्याची घरे अथवा झोपडपट्टी चाळींमध्ये अथवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना स्वतःचे घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करण्याकरीता एक योजना सुरू केली जाईल.
  • रूफटॉप सोलरायझेशनद्वारे १ कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल.
  • आमचे सरकार अशी आर्थिक धोरणे स्वीकारेल, जी विकासाला चालना देईल व तो शाश्वत करेल, सर्वसमावेशक, शाश्वत विकास सुलभ करेल, उत्पादकता सुधारेल, सर्वांसाठी संधी निर्माण करेल तसेच त्यांच्या क्षमता वाढवण्यास मदत करेल.
Previous Post

मोदी सरकारचा १० वर्षांचा लेखाजोखा.! राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील १० प्रमुख मुद्दे

Next Post

जिल्हा कोषागारात ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

जिल्हा कोषागारात ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळीपालन, पशुपालन प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळीपालन, पशुपालन प्रशिक्षण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.