• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 11, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदार नोंदणीच्या प्रयत्नांमुळे मतदारांच्या संख्येत भर

Our Media by Our Media
January 23, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 3 mins read
99 1
0
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत
14
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.23 : मतदार नोंदणीसाठी शिबिरे व विविध प्रयत्नांमुळे पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. महिला मतदारांची संख्याही वाढली असून, लिंग गुणोत्तरात 8 गुणांकांची वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली. नियोजनभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी 2023 रोजी प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात पुरुष मतदार संख्या 7 लाख 94 हजार 752 इतकी होती. दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीतील पुरुष मतदार संख्या 8 लाख 5 हजार 986 इतकी आहे. स्त्री मतदारांची प्रारूप मतदार यादीमधील संख्‍या 7 लाख 39 हजार 190 होती. ती अंतिम यादीनुसार 7 लाख 56 हजार 35 पर्यंत पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 930 स्त्रिया होत्या. हे प्रमाण अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांच्या मागे 938 स्त्रिया असे झाले आहे. तृतीयपंथी समुदायाची 23 जानेवारी 2024 मधील संख्या 49 इतकी आहेत.

प्रारुप मतदार यादीतील मतदार :

 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांच्‍या संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्‍ह्यातील दि. 27/10/2023 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्‍दी करण्‍यात आली होती. या यादीत खालीलप्रमाणे मतदार संख्‍या होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नांव दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिध्‍द

प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संख्‍या

पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 153594 138048 4 291646
2 29-बाळापुर 151132 138638 6 289776
3 30-अकोला (पश्चिम) 165704 160458 20 326182
4 31-अकोला (पुर्व) 172225 161613 15 333853
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 152097 140433 6 292536
एकूण…. 794752 739190 51 1533993

दावे व हरकती स्वीकारण्‍याच्‍या कालावधीत प्राप्‍त अर्ज :

विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्‍टोबर 2023 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली होती. दिनांक 27 ऑक्‍टोबर 2023 ते दिनांक 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्‍ये झालेली मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्‍तींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. मतदार संघ क्रमांक व नांव प्राप्‍त अर्ज संख्‍या स्विकृत अर्ज संख्‍या
नमुना 6 नमुना 7 नमुना 8 नमुना 6 नमुना 7 नमुना 8
1 28-अकोट 12512 4951 2979 13219 5836 2800
2 29-बाळापुर 15092 6298 3200 12421 3954 3008
3 30-अकोला (पश्चिम) 12781 10325 3168 11657 9763 2978
4 31-अकोला (पुर्व) 12317 7473 2519 11936 7245 2368
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 14008 8208 3837 13717 8075 3607
एकूण 66710 37255 15703 62950 34873 14761

अंतिम मतदार यादीतील मतदार :

वरीलप्रमाणे नोंदणी, वगळणी व दुरुस्‍ती पश्‍चात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या मतदार यादीनुसार मतदार संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नांव दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्‍द

अंतिम मतदार यादीनुसार मतदार संख्‍या

पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 156818 142208 3 299029
2 29-बाळापूर 154843 143396 4 298243
3 30-अकोला (पश्चिम) 165843 162212 21 328076
4 31-अकोला (पुर्व) 174008 164521 15 338544
5 32-मुर्तिजापूर (अ.जा.) 154474 143698 6 298178
एकूण 805986 756035 49 1562070

प्रारुप मतदार यादी व अंतिम मतदार यादी याची तुलना केली असता दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये एकूण 15,33,993 (पंधरा लाख तेहत्तीस हजार नऊशे त्र्यांनव) मतदारांचा समावेश होता. त्यानंतर दावे व हरकती सादर करावयाच्या कालावधीमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादी मध्ये मतदार संख्‍या ही 15,62,070 (पंधरा लाख बासष्ट हजार सत्तर) एवढी आहे यामध्ये 62,950 (बासष्‍ट हजार नऊशे पन्‍नास) इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर 34,873 (चौतीस हजार आठशे त्र्याहत्‍तर) एवढ्या दुबार, मयत व कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळण्‍यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीच्‍या तुलनेत मतदार संख्‍येमध्‍ये एकूण 28,077 इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे.

18-19 वयोगटातील मतदार :

सदर पुनरिक्षण कार्यक्रम व विशेष मोहिमेअंतर्गत वय वर्षे 18 ते 19 वयोगटांतील पात्र मतदारांवर प्रामुख्‍याने लक्ष केंद्रीत करुन शाळा, महाविद्यालये, युवा महोत्‍सव, सार्वजनिक ठिकाणी तसेच मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी भेटी देऊन तसेच मतदान केंद्रांवर मतदार नांव नोंदणीचे कार्यक्रम राबविण्‍यात येऊन तरुण व पात्र मतदारांचे अर्ज गोळा करण्‍यात आले. जिल्‍हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक घेण्‍यात येऊन महाविद्यालयामध्‍ये मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले व जिल्‍हयातील युवक–युवती यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहीत करण्‍यात आले. जिल्‍ह़्यातील प्रमुख महाविद्यालयांना प्रत्‍यक्ष भेटी देऊन तेथील विद्यार्थ्‍यांसोबत प्रत्‍यक्ष संवाद साधला तसेच त्‍यांना मतदार नाव नोंदणीचे महत्‍त्‍व पटवून देत त्‍यांचे व त्‍यांच्‍या परीवारातील सर्व सदस्‍यांची नांवे मतदार म्‍हणून नोंदणी करण्‍याबाबत प्रेरीत केले. वय वर्षे 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्‍या ही दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारुप मतदार यादीनुसार 4012 (0.26%) इतकी होती. वरील प्रयत्‍नांमुळे सदर संख्‍येमध्‍ये 16,621 इतक्‍या मतदारांची भर पडून दिनांक 23/01/2024 रोजीच्‍या अंतिम मतदार यादीमध्‍ये सदर मतदार संख्‍या ही 20,633 (1.41%) इतकी झाली आहे.

(PSEs- एकसारखे फोटो असलेले मतदार) व Demographic Similar Entries (DSEs- मतदार यादीत नांव व इतर काही तपशिल समान असलेले मतदार) :

अकोला जिल्‍ह्यातील मतदार यादीमध्‍ये असलेल्‍या Photo Similar Entries (PSEs- एकसारखे फोटो असलेले मतदार) व Demographic Similar Entries (DSEs- मतदार यादीत नांव व इतर काही तपशिल समान असलेले मतदार) यांची सखोल तपासणी करुन एकूण 8914 मतदारांची वगळणी करण्‍यात आली. हि वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशीररीत्या करण्‍यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.

भटक्‍या व विमुक्‍त जमातीतील मतदारांबाबत :

तसेच जिल्‍ह्यातील दुर्गम भागातील गांव, वस्‍त्‍्या, पाडे याठिकाणी संबंधीत तलाठी यांचेमार्फत प्रत्‍यक्ष भेटी देऊन भटक्‍या व विमुक्‍त जमातीच्‍या मतदार नोंदणीसाठी पात्र व्‍यक्‍तींना मतदानाचे महत्‍त्‍व पटवून देऊन पात्र व्‍यक्‍तींकडून मतदार नाव नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्‍यात आले. तसेच शासनाकडून पुरविण्‍यात येणा-या विविध सुविधा, दाखले, रेशन कार्ड इत्‍यादी त्‍यांना उपलब्‍ध करुन देण्‍यात आले. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ. क्र. जिल्‍हा लाभार्थ्‍यांची संख्‍या प्रत्‍यक्ष शिबिरात दिलेले लाभ
मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड जात प्रमाणपत्र इतर लाभ / दस्‍ताऐवज
1 अकोला 659 358 147 83 59 65

मतदार नोंदणीकरीता केलेले विशेष प्रयत्‍न :

महानगरपालीका, नगरपरिषद, नगरपालीका, ग्रामपंचायत यांचे मार्फत फिरणा-या कचरा गाड्यांव्‍दारे ध्‍वनीफितीव्‍दारे, Digital Display असलेल्‍या वाहनांव्‍दारे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाळापुर यांनी तयार केलेल्‍या “जागा हो… जागा हो… मतदार राजा जागा हो…” या व्हिडीओ गीता मार्फत जिल्‍ह्यातील मतदारांना प्रभावीत करुन मतदार जनजागृती तसेच मतदारांना मतदार यादीमध्‍ये नांव नोंदणी करणेकरीता प्रवृत्‍त करण्‍यात आले. तसेच मतदार जनजागृतीरथाव्‍दारे प्रत्‍येक मतदार संघामध्‍ये स्‍थानिक बोलीभोषेतील ध्‍वनीफित व्‍दारे व डिजीटल फ्लेक्‍स लावून मतदारांमध्‍ये जागृती करण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे शहरी भाग अधिक असलेल्‍या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्‍या आढावा बैठका घेऊन मतदार यादी शुध्‍दीकरण करण्‍याचे महत्‍त्‍व अधोरेखीत केले. त्‍याचप्रमाणे अधिक तत्‍परतेने कामकाज करण्‍यासाठी प्रवृत्‍त केले. सार्वजनिक गणेशोत्‍सव, नवरात्र उत्‍सव, कावड यात्रा इत्‍यादी ठिकाणी मतदार नाव नोंदणीबाबतचे स्‍टॉल लावून त्‍याठिकाणी अर्ज भरुन घेण्‍यात आले.  जिल्‍ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, कर वसुली लिपीक व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत त्‍यांचे कार्यक्षेत्रातील पात्र मतदारांकडून मतदार नांव नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्‍यात आले.

मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्‍याचे दृष्‍टीने अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सामाजिक संस्‍था इत्‍यादींचे मार्फत घरोघरी भेटी देऊन पात्र महिला, लग्‍न होऊन आलेल्‍या महिला यांचा शोध घेऊन त्‍यांचेकडून मतदार नाव नोंदणीचे अर्ज भरुन घेण्‍यात आले.  दुबार, मयत, स्‍थलांतरीत मतदारांच्‍या नावाची वगळणी करण्‍याचे अनुषंगाने महानगरपालीका, नगर परिषद, नगरपालीका, संबंधीत ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांचेकडील जन्‍म मृत्‍यू नोंदवहीच्‍या आधारे मयत मतदारांच्‍या नावाचा शोध घेऊन त्‍यांचे कुटूंबातील व्‍यक्‍तींकडून मतदार यादीतून नांव वगळणीबाबतचे नमुना 7 चे अर्ज भरुन घेण्‍यात आले आहेत. जिल्‍ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी/कर्मचारी व त्‍यांचे कुटूंबासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात आली. त्‍याअंतर्गत मतदार नांव नोंदणीबाबतचे नमुना 6 चे अर्ज, मतदार यादीतील तपशिलामध्‍ये दुरुस्‍ती करण्‍यासंबंधीचे नमुना 8 मधील अर्ज भरुन घेण्‍यात आले. दिनाक 23 जानेवारी रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना 6 भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना आणि पात्र व्‍यक्‍तींना मतदार नोदणीची अजूनही संधी आहे.

राष्‍ट्रीय मतदार दिवस :

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार संपुर्ण भारतात दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी 14 वा राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍याअनुषंगाने दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा स्‍तरावर राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्‍यात आले असून सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने सकाळी 8 वाजता अकोला जिल्‍हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटीका चौक ते मुख्‍य बस स्‍टॅंड चौक ते पंचायत समिती ते जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला अशी शालेय विद्यार्थ्‍यांची पायदळ रॅली जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे विविध स्‍पर्धा व लोकशाहीवर निष्‍ठा ठेवण्‍याबाबत सामुहीक शपथ ग्रहण इत्‍यादीचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदर शपथ जिल्‍ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्‍ये घेण्‍याबाबत या कार्यालयाकडून परिपत्रक देखील निर्गमीत करण्‍यात आलेले आहे.

Previous Post

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार

Next Post

वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Old Pension Scheme

वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परिक्षेत १० मिनिटे जादा वेळ मिळणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.