अकोला, दि. १३ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी अकोला येथे येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दु. २.१५ वा. तथागतनगर, जुने शहर, अकोला येथे आगमन व सुनील अवचार यांच्याकडील कार्यक्रमाला उपस्थिती, दु. ४ वा. येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, सायंकाळी ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले सभागृह येथे सभा, सायं. ६. ४५ वा. बुद्धविहार, कृषीनगर येथील कार्यक्रमाला उपस्थिती, सायं. ७. १५ वा. पुसदकडे प्रयाण.