अकोला,दि.8: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत सर्व व्यावसायिक दुकान आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावण्याबाबतची अधिसूचना शासनाने निर्गमित केली आहे . या अधिनियमांतर्गत दुकानदारांनी अंमलबजावणी करण्यााबाबत कामगार आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. अकोला जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.