• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण

Our Media by Our Media
November 21, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
2.5k 25
0
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण
357
SHARES
17.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. २१ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती- चिखली पॅकेज एक व दोनमधील चौपदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरूवारी (२३ नोव्हेंबर) मूर्तिजापूर येथे दु.२.२० येथे होणार आहे. पॅकेज एकमधील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते कुरणखेड या ५४ किमी लांबीच्या, तसेच पॅकेज दोनमधील कुरणखेड ते शेलाड या ५० किमी लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण होईल. या दोन्ही कामांचे मूल्य अनुक्रमे ९१२.४१ कोटी व ८१७.३५ कोटी रू. आहे.

अमरावती ते कुरणखेड टप्प्यात २ मोठे पूल, ४८ कल्व्हर्ट, २ वाहन भुयारी मार्ग,५ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे. कुरणखेड ते शेलाड टप्प्यात ४ मोठे पूल, ५६ कल्व्हर्ट, ११ वाहन भुयारी मार्ग, ४ पादचारी भुयारी मार्ग, १० बस थांबे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बाळापूर येथील बाळादेवी संस्थान, डोंगरगाव येथील अंबादेवी संस्थान, काटेपूर्णा येथील चंडिकादेवी मंदिर, माना येथील रामकृष्ण मंदिर, जैन मंदिर अशा धार्मिक स्थळांबरोबरच काटेपूर्णा अभयारण्य व अनेक महत्वाच्या ठिकाणी जलद पोहोचणे या महामार्गामुळे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे, अकोला – मूर्तिजापूर या कापूस उत्पादक प्रदेशाचा कापडनिर्मिती होणा-या सुरत, नागपूर अशा शहरांशी वेगवान संपर्क होईल.

बोरगाव मंजू येथे ४.७०० किमी लांबीचा बायपासमुळे तेथील शहरातून जाणा-या वाहनांची गर्दी कमी होईल व वाहतूक सुरळीत होईल. प्रवासातील वेळही वाचणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होणार आहे. अमृत सरोवर योजनेंतर्गत मूर्तिजापूर ते अकोला परिसरात २१ सरोवरांची निर्मिती झाली. या कामातील मुरूम, मृदेचा वापर महामार्गासाठी झाला. महामार्गनिर्मितीबरोबरच जलसंधारणाचे कार्य याद्वारे साधले गेले. अकोला ते वाशिम, अकोट, अकोला ते बार्शिटाकळी, मूर्तिजापूर ते कारंजा लाड, शेगाव या रस्त्यांशी महामार्ग जोडलेला असल्याने सर्वदूर दळणवळणाला गती मिळणार आहे. वाहन भुयारी मार्ग, पूल, पादचारी मार्ग यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन वाहतूक सुरळीत होईल व अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे.

Previous Post

संतापजनक! अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

Next Post

शेतजमीन असलेल्या मातंग समाजाच्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकऱ्याला

शेतजमीन असलेल्या मातंग समाजाच्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

सुप्रिम

स्‍पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आई-वडिलांच्‍या दबावामुळेच जीवन संपवतात : सर्वोच्‍च न्‍यायालयाची टिप्‍पणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.