• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात 14 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक

Our Media by Our Media
October 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
119 1
0
Election
17
SHARES
858
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.4: डिसेंबरमध्ये मुदत संपणा-या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तसेच  विविध कारणांनी सदस्य किंवा सरपंच पदे रिक्त झालेल्या 40 ग्रामपंचायतींत पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केला.

निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व रिक्त जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार तहसीलदारांकडून दि. 6 ऑक्टोबरला निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची वेळ दि. 16 ते दि. 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते दुपारी 3 वा. दरम्यान आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. सुरू होईल. नामनिर्देशनपत्रे दि. 25 ऑक्टोबर रोजी दु. 3 पर्यंत मागे घेता येतील. त्यानंतर दि. 25 ऑक्टोबर रोजी दु. 3 वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील, तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आवश्यक असल्यास दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वा. पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी व निकाल दि. 6 नोव्हेंबर रोजी घोषित होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना दि. 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.

जिल्ह्यात निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 56 सदस्य व 3 थेट सरपंच अशा एकूण 59 पदांची पोटनिवडणूक होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणाऱ्या 14 ग्रामपंचायतींची 14 सरपंच पदे व 111 सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होईल. त्यात तेल्हारा तालुक्यातील 3, मूर्तिजापूर तालुक्यातील 2, अकोला तालुक्यातील 4, बार्शीटाकळी 4 व पातूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. रिक्त पदांमुळे अकोट तालुक्यात बांबर्डा, अकोला तालुक्यातील भौरद व पातूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे थेट सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होईल.

Previous Post

सणांच्या काळासाठी पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये आदेश जारी

Next Post

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास ‘या’ दिवशी पडद्यावर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास ‘या’ दिवशी पडद्यावर

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास 'या' दिवशी पडद्यावर

भारताने रचला इतिहास! एशियन गेम्समध्ये पदकांचे शतक

भारताने रचला इतिहास! एशियन गेम्समध्ये पदकांचे शतक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.