• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

Our Media by Our Media
September 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
106 1
0
वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी
15
SHARES
766
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.18: डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी देण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज रूग्णवाहिका महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात आली. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी जिल्हाधिका-यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचा स्वीकार केला. महाविद्यालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाला डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोलाची मदत मिळाली आहे. ही रुग्णवाहिका रुग्णसेवेच्या कार्यात उपयुक्त ठरणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले.

हृदयरोगाशी संबंधित रुग्णाला ने-आण करण्यासाठी सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध असणारी कार्डियाकॲम्बुलन्स रुग्णालयाकडे असणे अत्यंत आवश्यक होते. ती प्राप्त झाल्याने रुग्णसेवेचा दर्जा निश्चित उंचावेल, असे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आरोग्यविषयक कार्यक्रमांत अनेक सेवाभावी संस्था शासनाला सहकार्य करतात. डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्ट अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांत नेहमी अग्रक्रमावर असतो, असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्याची कन्या असलेल्या उच्च विद्याविभूषित डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतीनिमित्त समाजसेवा या एकमेव उद्देशासाठी या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. डॉ. शकुंतला गोखले यांचा जन्म दोन जुलै 1938 रोजी वाशीम येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव नागेश केशव गोखले आणि आईचे नाव गंगाबाई गोखले असे होते. १९५४ साली गव्हर्नमेंट मल्टिपर्पज हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६१ साली त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. १९६३ साली नेत्रशल्य चिकित्सा शास्त्रात कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन मुंबई येथून डिओएमएस पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करुन १९६५ साली मुंबई विद्यापीठातून एम. एस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर एफआरसीएस होण्याचे आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

त्यांनी भारतात आणि इंग्लंड येथील अत्यंत प्रतिष्ठित आयुर्विज्ञान संस्थांमध्ये सेवा दिली. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर अकोला येथील या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत देशात आणि परदेशात आपली ओळख निर्माण केली. त्यांचे २२ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ट्रस्ट अनेक समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रशल्य चिकित्सा विभागाला यापूर्वी त्यांची मदत लाभली आहे.

Previous Post

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम

Next Post

सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

Rain

मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.