• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भरडधान्याची उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध राष्ट्रीय चर्चासत्राचा शुभारंभ

Our Media by Our Media
September 7, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
81 1
0
भरडधान्याची उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध राष्ट्रीय चर्चासत्राचा शुभारंभ
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.7: मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी भरडधान्याचा आहारात अवलंब महत्वाचा आहे. पशुखाद्यासाठीही भरडधान्ये अत्यंत उपयुक्त आहेत. उत्तम आरोग्यासाठी भरडधान्याचे संवर्धन व अवलंब ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा पशूपोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, तसेच इज्जतनगर (बरेली) येथील ॲनिमल न्यूट्रिशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भरडधान्याची पशु आहारातील उपयोगिताः क्षमता व भविष्यवेध’ याविषयी राष्ट्रीय चर्चासत्र व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, पशुआहार संघटनेचे अध्यक्ष डॉ. एल. सी. चौधरी, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे सदस्य डॉ. संदीप इंगळे, वरिष्ठ आहार तज्ज्ञ डॉ. विजय तिजारे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय चर्चासत्रात देशपातळीवरील अडीचशे तज्ज्ञ, अभ्यासक व  विद्यार्थी सहभागी झाले. शेतकरी, शास्त्रज्ञ व उद्योजक यांच्यातील संवाद हे सेमिनारच्या पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले. त्यात जवळजवळ 60 शेतकरी व पशुपालक यांनी भाग घेतला. पशुपोषणात चारानिर्मितीसाठी भरडधान्य लागवडीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.  .

नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ या संस्थेच्या वतीने भरडधान्यांचा मानवी आहारासाठी उपयुक्त  पदार्थांचे प्रदर्शन व मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. विविध पशुआहार व पशु औषधी निर्मिती कंपनी यांच्याही विविध दालनांचा प्रदर्शनात समावेश होता.

विविध अभ्यासक व विद्यार्थ्यांकडून भरडधान्यावरील आपल्या संशोधनाचे सादरीकरणही यावेळी झाले. पशुवैद्यक, पशुपोषण अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राच्या स्मरणिकेचे व मिलेटस किट्सचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

पशुपोषण विभागप्रमुख डॉ. कुलदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्वेता लेंडे सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल ढोक यांनी आभार मानले.

Previous Post

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या सूचना

Next Post

इंस्टाग्राम मित्राने तरुणीला घातला ५ लाखांचा गंडा पोलिसात गुन्हा दाखल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Instagram

इंस्टाग्राम मित्राने तरुणीला घातला ५ लाखांचा गंडा पोलिसात गुन्हा दाखल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा-जिल्हाधिकारी

नुकसानग्रस्तांना २५ टक्के अग्रीम देण्याबाबत अधिसूचना जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.