• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गणेशोत्सव पर्यावरण पूरक व शांततामय मार्गाने साजरा करावा

Our Media by Our Media
September 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
88 1
0
यशप्राप्तीसाठी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व मेहनत आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार
13
SHARES
635
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 1:  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्ते, पथदिवे दुरूस्ती, वीजपुरवठ्यात सुधारणा आदी बाबी प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी योजना दि. 9 सप्टेंबरला सुरू करण्यात येईल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

गणेशोत्सवाबाबत विविध मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, संग्राम गावंडे, ॲड. मोतीसिंह मोहता, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सभेच्या प्रारंभी विविध मंडळांची निवेदने व मागण्या जाणून घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची, पथदिव्यांची दुरूस्ती पूर्ण करण्यात येईल. विसर्जन मार्गावर दिवे, पेयजल, आरोग्य सुविधा व इतर सुविधा उभारण्यात येतील. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येईल. ‘महावितरण’कडून गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. मार्गात अडथळा करणा-या वीजतारा सुरक्षित उंचीवर न्याव्यात. मंडळांच्या मागण्यांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल. आस्थापनांना वेळ वाढवून देणे आदी सूचनांबाबतही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक साजरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव कालावधीत दुसरा दिवस (20 सप्टेंबर), पाचवा दिवस (23 सप्टेंबर) व अनंत चतुर्दशी (28 सप्टेंबर) या तीन दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रा. 12 पर्यंत ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत पर्यावरण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

Previous Post

दुष्काळाचे सावट गडद : सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस

Next Post

राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

Tadoba

ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.