• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘तलाठी भरती’ साठी बेरोजगारांनी भरले तब्बल १ अब्ज ४ कोटी १७ लाख १३ हजार रुपये

Our Media by Our Media
August 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
691 6
0
Eleventh-admission-form-can-be-f
100
SHARES
5k
VIEWS
FBWhatsappTelegram

सरकारी नोकरभरती हा सरकारचा उत्पन्नाचा नवा मार्ग आहे की काय, असा प्रश्न गुरुवारपासून सुरू झालेल्या तलाठी भरतीने निर्माण केला आहे. या भरतीसाठी सरकारने प्रत्येक उमेदवाराकडून एक हजार रुपये शुल्क उकळले आणि पुन्हा उमेदवाराने सुचवलेली तीन पसंतीची म्हणजेच सोयीची परीक्षा केंद्रे बाजूला ठेवून राज्याच्या दुसऱ्याच कोपऱ्यातील परीक्षा केंद्र बहाल केले. आधीच हजाराचे परीक्षा शुल्क आणि आता परीक्षा देण्यासाठी जाण्या-येण्याचा व केंद्रावर राहण्याचा खर्च असा मोठा भुर्दंड या बेरोजगारांवर लादला गेला आहे.

  • १०,४१,७१३ तलाठी पदांसाठी आलेले अर्ज
  •  १७ ऑगस्टला परीक्षा सुरू झाली. ही परीक्षा १८, १९, २०, २१, २२, २६, २७, २८, २९, ३१ ऑगस्ट आणि १, ४, ५, ६, ८, १०, १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
  • पहिल्या दोन तारखांचे उमेदवार या परीक्षा प्रक्रियेत भरडले गेले तरी ही प्रक्रिया बदलल्यास आणि परीक्षा केंद्रांचा निर्णय फिरवल्यास त्यापुढील सर्व तारखांच्या परीक्षार्थीची गैरसोय टळू शकते.
  • जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरच परीक्षार्थीना परीक्षा देण्याची मुभा द्यावी, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश टीसीएस कंपनीला द्यावेत आणि उमेदवारांकडून वसूल केलेले एक हजार रुपयांचे शूल्क प्रवासखर्च म्हणून तात्काळ परत करण्याची माणीही आता पुढे आली आहे.

ही व्यथा या एका उमेदवाराची नाही. सरकारने ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली आणि अर्ज आले तब्बल १० लाख ४१ हजार ७१३. छत्तीस जिल्ह्यांमधून हे अर्ज आले. त्यात या भरतीची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या नगर जिल्ह्यातूनच ६१ हजार ६३३ अर्ज आहेत. पुणे जिल्ह्यातूनही विक्रमी १ लाख १४ हजार ६८४ अर्ज आले. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची संख्या ही चार ते पाच अंकी आहे. खुल्या प्रवर्गातील 1 उमेदवारांना एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. मागास घटकांतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांबद्दल किंचित सहानुभूती दाखवत सरकारने शंभर रुपये तेवढे कमी केले आणि ९०० रुपये शुल्क उकळले. या भरतीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीकडे देण्यात आली. एकूण अर्जांच्या संख्येला सरासरी एक हजार रुपयांनी गुणले तरी परीक्षा शुल्कापोटी सरकारने उकळलेली रक्कम १ अब्ज ४ कोटी १७ लाख १३ हजार रुपये होते.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

परीक्षा शुल्कापेक्षाही परीक्षा देण्याचा खर्च वेगळा अन् जास्त संभाजीनगरच्या उमेदवाराला दिले वर्धा केंद्र

तलाठी भरतीची उलाढाल इथेच संपत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवाराला विदर्भाच्या वर्ध्यातील परीक्षा केंद्र तर यवतमाळच्या उमेदवाराला मराठवाड्याच्या कुठल्यातरी जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले गेले. उमेदवारांना तीन केंद्रांचे पर्याय सूचवण्याची मुभा देण्यात आली होती. ती चक्क गुंडाळून ठेवण्यात आली. सुचवलेल्या केंद्रांवर फुली मारत उमेदवाराचे मूळ ठिकाण आणि परीक्षा केंद्र यांतील अंतराचा विचार न करता दूरदूरची परीक्षा केंद्रे देण्यात आली. त्यामुळे परीक्षा शुल्कापेक्षाही या उमेदवारांना आता परीक्षेसाठीचा प्रवास आणि केंद्रांवरील मुक्काम यावर मोठा खर्च येईल. हा खर्च आता सरकार देणार की टाटा देणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केला.

तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्णपणे कॉर्पोरेट कंपन्यांच्या कब्जात देऊन महागडी करण्यात आली. इतकेच नव्हे तर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचा कालावधी आणि परीक्षेचा मुहूर्त यात केवळ ७२ तासांचे अंतर ठेवण्यात आले. पेपरफुटी टाळण्यासाठी किंवा सायबर सिक्युरिटी म्हणून ही खबरदारी घेतल्याचे टीसीएसने म्हटले असले तरी महाराष्ट्रातील चांदा ते बांदा भौगोलिक अंतर या कंपनीला ठाऊक नसावे आणि म्हणून लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांचे पर्याय भरलेले असताना ही केंद्रे सोडून चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा देण्यास उमेदवारांना भाग पाडले जात आहे. याकडेही क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.

Previous Post

नवसाक्षरता अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा

Next Post

मरणयातना चक्क मोबाईल व दुचाकीच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
मरणयातना चक्क मोबाईल व दुचाकीच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार

मरणयातना चक्क मोबाईल व दुचाकीच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार

जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध

जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.