अकोला, दि.3: महिला व बालविकास विभागाव्दारे राजामाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज(दि.3) मनुताई कन्या शाळा अकोला येथे करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षकाकडून विद्यार्थ्यांना समुपदेशन व स्वरंक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच राजामाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग 15 जुलैपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी मिना प्रधान यांनी दिली.
युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करण्यासारख्या विदयार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संघटना व थांगता असोसिऐशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात आजपासून करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अमरावती विद्यापीठचे सिनेट सदस्य पल्लवीताई कुळकर्णी, पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, सदस्या बालकल्याण समिती प्रांजली जैस्वाल, विदयार्थी विकास संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठचे संचालक राजीव बोरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिना प्रधान यांनी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
कार्यक्रमांची सुरुवात दिप प्रज्वलन व मॉ. जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिपाली इंगोले तर आभार प्रदर्शन रूपाली वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, निधी ट्रस्टचे कार्यकर्ते, स्त्री शक्ती संघटना यांनी प्रयत्न केले.