• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरबीआय कडून कर्जदारांना मोठा दिलासा ! व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय

Our Media by Our Media
June 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
86 1
0
rbi
12
SHARES
623
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज गुरुवारी आरबीआयचे द्विमासिक पतधोरण जाहीर केले. किरकोळ महागाई कमी करण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आरबीआयने रेपो रेट ६.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. (RBI Monetary Policy) एमपीसी (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ने पॉलिसी रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.

दरम्यान, स्थायी ठेव सुविधा (SDF) दरही स्थिर म्हणजे ६.२५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. सीमांत स्थायी सुविधा (marginal standing facility) आणि बँक दर (bank rates) ६.७५ टक्के आहे, असेही दास यांनी सांगितले. जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चित अवस्थेत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्र मजबूत आणि लवचिक आहे. महागाई कमी झाली असून परकीय चलनाचा साठाही स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्व घटक लक्षात घेऊन आणि यंदा सामान्य मान्सून राहण्याचे गृहीत धरून सीपीआय महागाई दर २०२३-२४ मध्ये ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. देशात मार्च-एप्रिल २०२३ दरम्यान महागाई कमी झाली आणि २०२२-२३ मधील ६.७ टक्क्यांवरून महागाई दर खाली आला. ताज्या आकडेवारीनुसार, महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा अधिक आहे आणि २०२३-२४ च्या आमच्या अंदाजानुसार महागाई दर तसाच राहण्याची शक्यता आहे. आमच्या मूल्यांकनानुसार, २०२३-२४ मध्ये महागाई दर ४ टक्क्यांच्या वर राहील, असे आरबीआय गर्व्हनर दास यांनी म्हटले आहे. (RBI Monetary Policy)

जीडीपी वाढ ६.५ टक्के राहणार

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची (GDP) वाढ २०२२-२३ मध्ये ७.२ टक्के होती. जी आधीच्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा मजबूत राहिली. आता सर्व बाबी विचारात घेतल्यास २०२३-२४ वर्षासाठी जीडीपी वाढ ६.५ टक्के असण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे.

एप्रिलमधील शेवटच्या एमपीसीच्या (monetary policy committee) बैठकीनंतर आरबीआयने व्याजदर वाढीला विराम दिला होता. आरबीआयने ६.५ टक्के रेपो रेट कायम ठेवला होता. याआधी आरबीआयने महागाई रोखण्यासाठी मे २०२२ पासून रेपो रेट २५० बेसिस पॉइंटने वाढवला होता.

दरम्यान, यावर्षी एप्रिलमध्ये महागाई दर (CPI) ४.७ टक्क्यांपर्यंत १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. शक्तीकांत दास यांनी याआधी सूचित केले होते की एप्रिलच्या तुलनेत मे मधील महागाई दर कमी असेल. मे महिन्याचा महागाई दर १२ जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

जेव्हा रेपो रेट कमी होतो तेव्हा बँकांना RBI कडून कर्ज घेणे स्वस्त होते. (RBI Monetary Policy) तसेच कर्जदारांनाही कर्जाचा हप्ता कमी होऊन दिलासा मिळतो.

Previous Post

खरीप पिकांच्या एमएसपी दरात भरीव वाढ

Next Post

शाहिरांच्या विररस, स्फूर्ती गितांनी शिवप्रेमी श्रोते मंत्रमुग्ध,शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शाहिरांच्या विररस, स्फूर्ती गितांनी शिवप्रेमी श्रोते मंत्रमुग्ध,शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा

शाहिरांच्या विररस, स्फूर्ती गितांनी शिवप्रेमी श्रोते मंत्रमुग्ध,शिवराज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा

शिवराज्याभिषेकदिनी देशातील पहिले लोकशाहीचे राज्य निर्माण झाले- सौरभ वाघोडे 

शिवराज्याभिषेकदिनी देशातील पहिले लोकशाहीचे राज्य निर्माण झाले- सौरभ वाघोडे 

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.