• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जगासाठी भारतच भाग्यविधाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Our Media by Our Media
May 24, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
87 1
0
मोदी
13
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

भारताचे विकासचक्र गतिमान झाले असून, अनेक शिखरे पदाक्रांत करीत भारत जगावर आपला ठसा उमटवत आहे. उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्था, युवांची ताकद, कौशल्याचे भांडार असलेला भारत जगासाठी भाग्यविधाता बनू पाहत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. सिडनी येथे ऑलिम्पिक स्टेडियममध्ये 20 हजार उत्साही भारतीयांना उद्देेशून त्यांनी भारताची यशोगाथा सांगतानाच ऑस्ट्रेलियासोबतच्या द़ृढ संबंधांनाही उजाळा दिला.

हिरोशिमा आणि पापुआ न्यू गिनीच्या दौर्‍यांनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सिडनीच्या भव्य ऑलिम्पिक स्टेडियमवर सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या 20 हजारांहून अधिक भारतीयांची उपस्थिती होती. शेकडो जण विविध ठिकाणांवरून विशेष विमाने करून सिडनीत आले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संकट असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ चांगली आहे. बँकिंग क्षेत्र मजबूत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा, सर्वात तरुण टॅलेंटचा कारखाना आहे. भारताकडे ना क्षमतेची चणचण आहे, ना गुणवत्तेची. आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा चमकता किरण मानते. जागतिक बँक म्हणते की, जगातील मोठ्यात मोठ्या आव्हानांचा मुकाबला कोण करू शकत असेल तर तो भारत आहे. जगातील अनेक बड्या देशांतील बँकिंग व्यवसथा अडचणीत असताना, भारतील बँकिंग क्षेत्र ज्या प्रकारे काम करत आहे, त्याचे जगात कौतुक होत आहे. कोरोनासारख्या शतकातून एकदा येणार्‍या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्यावर्षी विक्रमी निर्यात केली. विदेशी चलनसाठ्याच्या बाबतीत भारताने नवीन उच्चांक गाठला आहे. भारताची फिनटेक क्रांती हे बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ब्रिस्बेनमध्ये वाणिज्य दूतावास

भारताच्या ऑस्ट्रलियासोबतच्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन देशांमध्ये भले कितीही भौगोलिक अंतर असेल पण हिंदी महासागर या दोन देशांना जोडणारा दुवा आहे. जीवनशैली भिन्न असेल पण योगा दोन देशांना जोडतो, वर्षानुवर्षे क्रिकेटच्या धाग्याने, टेनिसच्या आवडीने, मास्टरशेफच्या प्रेमाने दोन देश जोडले गेले आहेत. हे संबंध आगामी काळात आणखी द़ृढ होतील. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिस्बेनमध्ये भारत लवकरच आपला वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे.

अल्बानेस म्हणाले, मोदी इज बॉस 

सिडनीच्या सभेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस आवर्जून उपस्थित होते. पंतप्रधान मोदी अल्बानेस यांना हाताला धरून जेव्हा कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा ‘मोदी मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले. यावेळी अल्बानेस मोदी यांची लोकप्रियता पाहून चांगलेच भारावले. त्यांनी या सभेला झालेल्या गर्दीची तुलना विख्यात रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टनसोबत केली. याआधी एवढी गर्दी आणि लोकप्रियता फक्त ब्रूसच्याच कार्यक्रमाला पाहायला मिळाली. त्याला आज मोदी यांनी मागे टाकले आहे. ‘मोदी इज द बॉस’,असेही अल्बानेस म्हणाले.

Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.26 रोजी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया

Next Post

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण २०० जणांचा सहभाग

जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण २०० जणांचा सहभाग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.