• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

Our Media by Our Media
May 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
121 1
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
17
SHARES
872
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.11:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी विविध योजना राबविले जातात. चर्मकार समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी राज्य शासनाव्दारे अनुदान व बीजभांडवल योजना तर केंद्र शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविली जातात. या शासकीय योजनाचा चर्मकार समाजानी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अनुदान व बीजभांडवल योजना

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अर्टीशर्ती : विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे यापुर्वीचे जुने कर्ज प्रस्ताव रद्द/बाद करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात/टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्जप्रस्ताव अपात्र/ रद्द करण्यात येईल. अर्जदार यांनी खाली नमुद केलेली कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही. अर्जदारांकडून सर्व परीपुर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक असून अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात अडथळा या सदराखाली संबंधित मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल.  कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस/महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पध्दतीने कर्जप्रस्ताव जेष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

दाखल करावयाचे कागदपत्रे : जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला(चालू वर्षाचा), रेशनकार्ड झेरॉक्स/रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र,आधारकार्ड,  कोटेशन(GST सह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, चाहनाकरिता लायसन्स/परतावा/बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल/टॅक्स पावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र.

केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना

ज्या लाभार्थीनी यापुर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअतंर्गत कर्जप्रस्ताव दाखल केले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधून कागदपत्रे दाखल करावी.

कागदपत्रे याप्रमाणे : लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्या जागेचा प्रमाणित केलेले छायाचित्र. चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला. दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा केला नाहीतर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र. जर लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा पाच ते सहा वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक. जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस, लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र. यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ. लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक. जीएसटी क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक. अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल करावीत.  चर्मकार समाज बांधवांनी शासकीय योजनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Previous Post

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरात युवकांना होणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

Next Post

चोवीस वर्षीय युवकाची आत्महत्या,गुप्तांगावर जखमा शहरात चर्चेला उधाण हत्या की आत्महत्या!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चोवीस वर्षीय युवकाची आत्महत्या,गुप्तांगावर जखमा शहरात चर्चेला उधाण हत्या की आत्महत्या!

चोवीस वर्षीय युवकाची आत्महत्या,गुप्तांगावर जखमा शहरात चर्चेला उधाण हत्या की आत्महत्या!

जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

जलजागृती प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.