अकोट (शिवा मगर),दि.२५/०४/२०२३ ला रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान १) पंकज राजेन्द्र गुप्ता,वय ५२ वर्ष रा.जलतारे प्लॉट, अकोट २) योगेश देविचंद सोनी, वय ४२ वर्ष रा. जिनगरवाडी अकोट, हे हिवरखेड रोड अकोट येथे रेल्वे गेटजवळ असलेल्या राज विर हॉटेल समोर अकोट शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून हिवरखेड रोड अकोट येथे रेल्वे गेटजवळ असलेल्या राज विर हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला आयपीएल २० कप २०२३ मुंबई इंडीयन विरुध्द गुजरात क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टा धंद्यावर रेड केली असता वरील आरोपी आढळून आले. आरोपींकडून घटनास्थळी एक विओ कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल कीमत १४०००/- रुपये, क्रीकेट सट्टाच्या ०२ चिठ्या, एक डॉट पेन व क्रीकेट सट्याची खायवाडी केलेले नगदी १५०/- रूपये तसेच एक एम आय कंपनी अँड्रॉइड मोबाईल कीमत १२०००/- रूपये, क्रीकेट सटयाची खायवाडी लिहीलेली ०१ विटी, एक डॉट क्रीकेट सट्याची खायवाडी केलेले नगदी १०६० /- रूपये असे एकुण दोन मोबाईल सह कि २७,२१०/-रु.चा मुद्देमाल जप्त केला.सदर मुद्देमाल ताब्यात घेतला व सदर गुन्हयातील नमुद आरोपी हयाचे विरुद्ध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर कार्यवाही अकोट शहर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. उमेश पराये ना.पो.कॉ.अमोल बहादूरकर नापोकों चंद्रप्रकाश सोळंके, विजय चव्हाण, पोका, विशाल हिवरे, सागर मोरे यांनी केली.