अकोला, दि.17 :- जिल्ह्यासाठी माहे मार्च महिन्यासाठी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप परिमाण व दर याप्रमाणे-
- प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,मोफत
- प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती,मोफत
- अंत्योदय अन्न योजना गहू-15 किलो प्रति कार्ड,मोफत
- अंत्योदय अन्न योजना फोर्टफाईड तांदूळ-20किलो प्रति कार्ड, मोफत
- नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो
प्रति शिधापत्रिका, 20 रुपये प्रतिकिलो.
- शासनाकडून कल्याणकारी संस्था व वसतीगृह येाजनेच्या वाटप परिमाणामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून योजनेचे वाटप परिमाण ऑक्टोंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीकरिता कल्याणकारी संस्था व वसतीगृहातील प्रति विद्यार्थ्यांना 4.5 किलो तर तांदुळ प्रति विद्यार्थी 10.5 किलो करण्यात आले आहे.
हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.