अकोला,दि. ७ :- जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद, मगरपंचायत ,ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ करिता इच्छुक सेवा केंद्र, स्थानिक केंद्रधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांनी दि.२० पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
इच्छुक अर्जदारांनी दि.८ ते २० दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.akola.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा. जिल्हा सुचना विज्ञान केंद्रास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दि.२० पर्यंत सादर करावा. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार होणार नाही.यापूर्वी ज्यांनी आधार सेवा केंद्र मिळण्यासाठीअर्ज केले असतील त्यांनीही पुन्हा अर्ज करावे. यासंदर्भातील सर्व अटीशर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जे अर्जदार पात्र ठरतील त्यांनी अर्ज भरतेवेळी ज्या भागात केंद्र मागितले असेल तेथेच केंद्र सुरु करणे बंधनकारक असेल. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सर्व अनुषंगिक कागदपत्रे अर्ज स्विकृती केंद्रात भरलेल्या अर्जासोबत जमा करावे. पात्र अपात्र उमेदवारांची सर्व माहिती www.akola.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जागांमध्ये वा वेळापत्रकांमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष यांचेकडे राखीव आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.