अकोला :- बाळापूर सहा नंबर हायवे मुंबई जाणारा मार्ग शेगाव चौफुली येथे असणारी हिमालय डीपी चार ते पाच दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकरी चे पीक धोक्यात आले आहे. बंद असलेले डीपी लवकरात लवकर सूरू करावी अशी मागणि अशोका फाऊंडेशन तसेच बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हायवे क्र ०६ रस्त्याचे काम सुरू असून त्यांच्या चुकीमुळे खोदकाम करतांनी अंडरग्राऊंड असलेला केबल तोडला त्यामुळे जम्मू शेठ ची डीपी, हिमालय डीपी, शेगांव चौगुले डीपी, अशा तीन डिप्या बंद आहेत .अशोका फाऊंडेशन तसेच बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी एम.एस.सी.बी व राजमार्ग प्राधिकरण चे कर्मचारी दिलीप सिंग यांना विचारणा केली, असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. तिन ते चार दिवसांपासून सदर डिप्या बंद असल्याने शेतातील पिकांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
ह्या डीप्या बंद असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. लवकरात लवकर डीपि सुरू करण्यात यावी अशी मागणी अशोका फाऊंडेशन तसेच बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी केली आहे. यावेळी ठिकाणी उपस्थित साजिद भाऊ इकबाल, अयाज खान निसार खान, मिर्झा बेग, सय्यद जुबेर शेख साईद, रियल खा उपस्थित होते.