अकोला प्रती – सर्वोपचार रुग्णालय परीसरात खुप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले असून बगीचा तयार झाल आहे सर्वोपचार रुग्णालयात अपघात कक्ष, नेत्ररोग विभाग, त्वचा रोग विभाग, कर्मचारी निवासस्थान महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर खूप मोठ मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले आहे. सर्वोच्च रुग्णालयात गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईक यांना त्या गांजर गवतातच बसावं लागते, वार्डाच्या बाहेर झोपावे लागते या गाजर गवतामुळे खुप मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत रुग्णां सोबत रुग्णांची काळजी घ्यायला आलेला नातेवाईक या गाजर गवतामुळे चिकणगुणीया, येल्लो फिवर, मलेरिया, टाईफाइड, डेंग्यू, झिंका या आजारांना मोफतच आमंत्रण देऊन यांसारख्या आजाराला नाहक बळी पडतात.
या वाढलेल्या गांजर गवतामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील महात्मा फुले जीवनदायी योजना कार्यालय याच्या प्रवेशद्वारावरच खूप मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले आहे ये-जा करताना किंवा वार्डाच्या समोर गांजर गवतात बसलेले रुग्णाच्या नातेवाईकांना एखादा साप चावला व जिवितहानी झाली तर त्याला सर्वोपचार रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार आहे सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता, शासकीय सर्वोपचार रुग्णालय शासकीय इमारत, प्रशासकीय इमारतीची नित्यनेमाने दररोज साफसफाई होते, परंतु वार्डाच्या समोर, कर्मचारी निवासस्थाना समोर व ये जा करणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गांजर गवत वाढलेले दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे ? रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असुन हे थांबवा व सर्वोपचार रुग्णालयातील वाढलेले गांजर गवत तात्काळ काढण्यात यावे व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल अशी मागणी महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.