तेल्हारा- तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी आदमपूर येथील कु. श्रेया गजानन भदे (वय 20 दिवस) रा. रामतीर्थ ता. दर्यापूर जि. अमरावती हल्ली मुक्काम वाडी अदमपूर हिची दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी तब्येत खराब असल्याने तिला तिची आई लक्ष्मी गजानन भदे व तिचा मामा सौरव बरिंगे यांनी उपचार कामी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्या बाळाला पुढील उपचार कामी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.
ॲम्बुलन्स ने श्रेयाला घेऊन तेल्हारावरून अकोला येथे नेले असता तिला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी चेक करून दाखल पूर्व मृत घोषित केले .यावरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे मर्ग क्रमांक oo/2022 कलम 174 फौ.प्र.सं. प्रमाणे दाखल केला. नंतर तिचे शवविच्छेदन न्यायसहायक विभागातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी केले.
व सदर मर्ग पुढील तपास कमी पोलीस स्टेशन तेलारा येथे वर्ग करण्यात आल्याने दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन तेल्हारा येथे मार्ग क्रमांक 36/2022 क्र.174 फौ.प्र.सं. दाखल करून तपासात घेतला तपासा दरम्यान शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता त्यात मृत बालिकेचा मृत्यू हा कशाने तरी गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर मर्गच्या अनुषंगाने इतर पूरक तपास केला असता असे निष्पन्न झाले की मयत श्रेया गजानन भदे वय वीस दिवस हिला जेव्हा तेल्हारा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून रेफर केले असता तेल्हारा येथून अकोला येथे उपचार कामी अंबूलस मध्ये घेऊन जाताना तिची आईनेच मयत बालिका श्रेयाचा कशाने तरी गळा आवळून खून केला आहे. त्यामुळे आज रोजी कलम 302 भांदवीप्रमाणे लक्ष्मी गजानन भदे वय 26 वर्षे रा. रामतीर्थ ता. दर्यापूर जि. अमरावती हल्ली मुक्काम वाडी अदमपूर ता. तेल्हारा जि. अकोला हिचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे करीत आहेत.