अकोला,दि.28 -: पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. ही मोहिम दि. 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शुकवार दि. 30 सप्टेंबर रोजी पंचायत समिती बार्शीटाकळी यांच्या कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे सहायक निबंधक यांनी केले आहे.
मोहिमेचे उदिष्टे : ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा सर्व शेतकरी बांधवानी आपल्या संबधित बॅक शाखेची संपर्क साधून क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देणे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट आहे, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करणे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून ते अक्रियाशील आहे ते कार्ड क्रियाशील करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्या लाभार्थी लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या बँक शाखेशी त्वरीत संपर्क करून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घ्यावे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या निकषानुसार कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा,असे आवाहन अग्रणी बॅकेचे जिल्हा प्रबंधक व सहकार संस्थेचे सहायक निबंधक यांनी केले.