अकोला दि.24 :- भारत निवडणूक आयोगाने दि. 14 जुलै 2022 च्या पत्रान्वये अमरावती पदवीधर मतदार संघाची मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्णत: नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहिम शनिवार दि. 1 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. या मोहिमेचा पदवीधर मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
नोंदणी कार्यक्रम याप्रमाणे:
1. शनिवार दि. 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2022 याकालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमूना 18 स्विकारण्यात येतील.
2. दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध.
3. दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर दि. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.