अकोला :- अकोला जिल्हयातील सर्व नागरीकांना अकोला जिल्हा पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येते की, सोशल मिडीया व्दारे लहान मुलांना किडनॅप करणारी टोळी कार्यरत असल्या बाबत काही अफवा पसरविल्या जात आहे.
त्या अनुषंगाने सर्व नागरीकांना कळविण्यात येते की १. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवु नये २. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना अकोला जिल्हयात अथवा आजु बाजुवे जिल्हयात कोठेही घडली नाही ३. लहान मुलांना पळविणारे कोणतीही टोळी जिल्हयात कार्यरत नाही ४. जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीसांची दिवस रात्र सतत २४ तास पेट्रोलींग सुरू आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवु नये तसेच सर्व शाळा व कॉलेज यांचे मुख्याध्यापक यांनाही कळविण्यात येत आहे की सोशल मिडीया वरील अफवावर विश्वास ठेवु नये तसेच अफवा पसरवु नये. असे काही आढळुन आल्यास जवळचे पोलीस स्टेशनला तात्काळ माहीती देवुन कळवावे.