मुंबई : महाराष्ट्र हेल्थ आणि टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET)च्या PCB आणि PCM या दोन ग्रुपचा निकाल आज (गुरुवार) जाहीर होणार आहे. हा निकालhttps://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर पाहाता येणार आहे.
इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, अॅग्रिकल्चर आणि फार्मसी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून निकाल पाहाता येणार आहे. हा निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. ही परीक्षा ५ ऑगस्टला झाली होती. पण अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे २९ ऑगस्टला ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती.