• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लम्पि चर्मरोग आढावा बैठक :जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर राबवा- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

Our Media by Our Media
September 8, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
86 1
0
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
13
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.८ : – लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना असून हे लसीकरण युद्धपातळीवर राबवावे, असे निर्देश राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी, असे निर्देश ना. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

लम्पि चर्मरोग या जनावरांमधील संसर्गजन्य आजारासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज अकोला जिल्ह्यात आले होते. त्यांनी सकाळी निपाणा व पैलपाडा या गावांमध्ये भेट देऊन बाधीत पशुंची पाहणी केली. पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या बैठकीस विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, स्नातकोत्तर पशुवैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिघे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, बुलडाणा- वाशीमचे उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद वानखडे, डॉ. लोणे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यक अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत सादर करण्यात आलेली माहितीः-

लम्पि चर्मरोग संदर्भात दि.१८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात पवन श्रीराम नाचोने यांच्याकडील बैलास सर्वप्रथम लक्षणे आढळून आली. त्यानंतर नमुने पाठविण्यात आले. अहवाल सकारात्मक आल्यानंतर लगेचच दि.२५ ऑगस्ट पासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ लक्ष ८३ हजार ६८ पशुधन असून त्यात २ लाख ३३ हजार २७१ गायवर्गीय असून ४९ हजार ७९७ म्हैस वर्गीय आहेत. लम्पि चर्मरोगग्रस्त जनावरांची संख्या ४९२ आहे. त्यात १६० गायी, ३३० बैल आहेत तर दोन म्हशींनाही लागण झाली आहे. बाधीत जनावरे असलेल्या गावांतील जनावरांची संख्या एकूण ५६ हजार ४१० इतकी आहे. त्यात आतापर्यंत उपचारानंतर ३३७ जनावरे पूर्ण बरी झाली आहेत. तर ३६ हजार ७६६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत १५५ जनावरांवर उपचार सुरु आहेत. बाधीत गावे व बाधीत गावांच्या पाच किमी त्रिज्येतील बाधीत तसेच अबाधित जनावरांचे लसीकरण, गोचीड गोमाशा निर्मूलन, गोठ्यांचे निर्जंतूकीकरण इ. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, बाधीत जनावरांचा उपचार व अबाधित जनावरांचे लसीकरण शासनातर्फे मोफत करण्यात येत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पशुचिकित्सालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांचा व अन्य औषधोपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर राबविणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय पशुवैद्यकांना मदतीसाठी खाजगी पशुवैद्यकांनी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व खाजगी पशुवैद्यकांच्या सेवा घ्याव्या. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातल्या यंत्रणा आणि पशुपालक शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण या संसर्गजन्य आजाराच्या साथीतून आपले पशुधन सुरक्षित ठेवू, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या व अशा अन्य साथीच्या आजारांसाठी पशुविज्ञान विद्यापीठे व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्त पणे उपाययोजना राबवाव्या. राज्य शासनाच्या प्रयोगशाळांचा आणि विद्यापीठांतील प्रयोगशाळांचा समन्वय साधून त्या योगे अधिक संशोधन करावे व पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत उपस्थित आ. हरिष पिंपळे व आ. प्रकाश भारसाकळे यांनीही महत्वाच्या सुचना केल्या. त्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकांची रिक्तपदे भरणे,लसीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, जनावर दगावल्यास शेतकऱ्यास मदत मिळवून देणे आदी मुद्यांचा समावेश होता.

या बैठकीत त्यांनी अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेतला.

Previous Post

Apple Launch Event Highlights Apple ने iPhone 14, Plus, Pro सह केली नवीन प्रॉडक्ट्स लॉंच, जाणून घ्या किंमत

Next Post

पत्रपरिषद प्रादुर्भाव रोखण्यात यश, सतर्कता मात्र कायम पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पत्रकार परिषद

पत्रपरिषद प्रादुर्भाव रोखण्यात यश, सतर्कता मात्र कायम पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पैलपाडा

‘लम्पि चर्मरोग’ प्रादुर्भाव: निपाणा व पैलपाडा येथे पाहणी; बाधीत क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा- पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.