अकोला दि.22 : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट येथे रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन (दि.२०) करण्यात आले. या मेळाव्यात १६० प्रशिक्षणार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी ८१ प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.
आयटीआय मधील भरती मेळाव्यासाठी सुझुकी मोटर्स हंसलपुर, अहमदाबाद, गुजरात या कंपनीसाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात फिटर, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेईकल, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, पेंटर जनरल, ट्रॅक्टर मेकॅनिक, इ. व्यवसायाच्या एकूण १६० प्रशिक्षणार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी ८१ प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात रुजू करण्यात येईल. या मेळाव्यासाठी उपप्राचार्य एस.आर.ठोकरे, कनिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.बी.घोंगडे, शिल्पनिदेशक एस.एस.कलोरे, एस.पी.कोलते,एस.पी. वानखेडे व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.