• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कृषी विभागाची कारवाई: बियाणे, खते, किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन; एक परवाना रद्द तर 19 परवाने एक महिन्यासाठी निलंबित

Our Media by Our Media
July 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
691 7
0
कृषी विभागाची कारवाई: बियाणे, खते, किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन; एक परवाना रद्द तर 19 परवाने एक महिन्यासाठी निलंबित
110
SHARES
5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.18:  बियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 9 कृषी निविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करत 19 परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले तर एक परवाना रद्द केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, कृषी निविष्ठा केंद्र तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार भरारी पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकांच्या कारवाईचा आढावा जिल्हाधिकारी यांनी दर सोमवारी घेतल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भातील आजच्या आढावा बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ. मुरली इंगळे, सर्व तालुका कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या बैठकीत माहिती देण्यात आली की, या पथकाव्दारे जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी निविष्ठा केंद्राच्या तपासणीमध्ये 13 कृषी निविष्ठा केंद्रात त्रुटी आढळल्याने त्यांचे 23 परवाने कायदेशीर कारवाईकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले होते. त्यावर कारवाई करीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी अकोला येथील पाटणी ट्रेडर्स यांचा रासायनिक खत परवाना रद्द केला. तर बार्शी टाकळी तालुक्यात मे. कळंब कृषी सेवा केंद्र यांचे व साईबाबा कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके असे प्रत्येकी तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. मुर्तिजापूर तालुक्यात मे गुरुकृपा ॲग्रो एजन्सीज बियाणे व रासायनिक खते विक्री , मे. गजानन ॲग्रो एजन्सीज यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री, तसेच मे शेतकरी कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे व रासायनिक खते विक्री असे प्रत्येकी दोन या प्रमाणे असे एकूण सहा परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. बाळापूर तालुक्यात मे विदर्भ इरिगेशन यांचे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व शिव ॲग्रो एजन्सीज चे बियाणे, किटकनाशके व रासायनिक खते असे तीन परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. तर पातुर तालुक्यात मे सोपीनाथ कृषी सेवा केंद्र यांचा बियाणे परवाना एक महिन्यासाठी निलंबित केला आहे. असे एकूण 9 विक्रेत्यांच्या 20 परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात एक परवाना रद्द तर 19 परवाने हे एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. खत नियंत्रण आदेश 1985, बियाणे नियंत्रण आदेश 1983, किटकनाशक नियंत्रण आदेश 1968 नुसार ही कारवाई करण्यात आल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके विक्री संबंधी तक्रारी असल्यास संबंधीत तालुका व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. या बैठकीस स्वतः तक्रारदार स्वतः शेतकऱ्यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Tags: AgricultureAkolaCollector Nima Aroralicense
Previous Post

बाळापूर येथे अशोका फाउंडेशन च्या वतीने त्रिपाल व छत्रीचे वाटप

Next Post

जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

rain-2 (1)

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.