राज्यात संततधार पाउस सुरु असल्याने वाहनाचे पाघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर अकोल्यात नुकताच तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, काल रात्री याच उड्डाणपूलावरुन टावरकडे जात असलेल्या मोटारसायकला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोटारसायकलवरील एक युवक चक्क खाली फेकल्या जावून खाली पडला आणि घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरील दुसरा युवक गंभीररीत्या जख्मी आहे. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात अशोक वाटिका जवळून जाणाऱ्या नवीन उड्डाणपूलावर घडला असून, अपघातग्रस्त युवक अकोला औद्योगिक वसाहत क्रमांक मधील 4 रहिवाशी वेदांत गजानन तायडे (१६) आणि शिवरत्न शर्मा (३०) मोटारसायकलने अकोल्याकडे येत होते. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलावरील वळणावरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की मागे बसलेला वेदांत तायडे पुलावरुन खाली फेकल्या जावून अशोक वाटिका जवळ रस्त्यावर पडला.
एवढ्या उंचीवरुन खाली कोसळल्याने जागेवर वेदांत तायडेचा मृत्यू झाला. तर गंभीररीत्या जख्मी झालेल्या शिवनवरत्न शर्माला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवीन उड्डाणपूलावरील हा पहिला अपघात असून या अपघातात मोटारसायकलस्वार खाली फेकल्या जाणे,ही चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी गंभीरपणे दखल घेऊन, योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.