• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आधार सेवा केंद्रांवरील सेवांचे दर निर्धारीत; अतिरिक्त शुल्क देऊ नका- निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Our Media by Our Media
July 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना
Reading Time: 1 min read
105 1
0
Aadhaar-Card-Logo
22
SHARES
755
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१२:  नागरिकांना देण्यात येणार आधार ओळखपत्र देण्यासाठी आधार सेवा केंद्र कार्यरत आहेत. याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवांसाठी विहित दरापेक्षा अतिरिक्त शुल्क देऊ नये, तसेच दिलेल्या शुल्काची पावती घ्यावी व पावती देत नसल्यास शुल्क देऊ नये. अशा प्रकारे शुल्क आकारले जात असल्यास तशी रितसर तक्रार करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती संजय खडसे यांनी केले आहे.

यासंदर्भात देण्यात आलेली माहिती अशी की, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत आधार नोंदणी व दुरुस्ती साठी UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांचे नियमानुसार नागरिकांना सेवा प्रदान करण्यासाठी ‘आधार सेवा केंद्र’ कार्यरत आहे, त्याद्वारे Online पद्धतीने नागरिकांचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक माहिती (फिंगर प्रिंट,आयरीस व डेमोग्राफिक माहिती) नागरिकांची कागदपत्रे स्कॅन करून UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात येते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे नागरिकांच्या बायोमेट्रिक व डेमोग्राफिक माहिती तसेच डेटा गुणवत्ता पडताळून नवीन आधार कार्ड वा अस्तित्वात असलेल्या आधार कार्डाच्या तपशिलत दुरुस्ती केली जाते. नागरिकांनी नवीन आधार कार्ड तसेच दुरुस्ती झाल्यानंतर आधार सेवा केंद्रावरून अथवा https://uidai.gov.in या संकेतस्थळावरून आपले आधार प्राप्त करून घ्यावयाचे असते.

नवीन आधार नोंदणी व आधार दुरुस्तीसाठी UIDAI, क्षेत्रिय कार्यालय मुंबई यांच्या नियमानुसार आकारण्यात येणारे शुल्क व आधार प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी लागणारा कालावधी याप्रमाणे असतो-

1)नवीन आधार नोंदणी- निःशुल्क, 2) अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट- निःशुल्क, 3) बायोमेट्रीक अपडेट- 100 रुपये, 4) डेमोग्राफिक अपडेट-50 रुपये. या सर्व सेवांसाठी लागणारा कालावधी 20 दिवस इतकाच असतो.

याप्रमाणे नमूद केलेल्या सेवांसाठी व सेवांव्यतिरिक्त आधार नोंदणी करिता कोणतेही अतिरिक शुल्क देण्याची आवश्यकता नसते. तरी नागरिकांनी विहित केलेल्या दरापेक्षा कोणतेही शुल्क अदा करु नये. जे शुल्क आकारले जाते त्याची पावती अवश्य घ्यावी. पावती दिली जात नसेल तर शुल्क देऊ नये. तसेच आधार सेवा केंद्र चालक अथवा कोणीही जास्त रक्कम आकारत असल्यास त्याबाबतची रीतसर तक्रार तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडे करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती संजय खडसे यांनी केले आहे. असे जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: Aadhaar cardAkolasanjay khadse
Previous Post

कावड यात्रा मार्गाच्या दुरुस्तीसाठी श्रीराम सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Next Post

जिल्ह्यातील कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश रद्द

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

जिल्ह्यातील कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश रद्द

Akola logo

शिक्षण विभागाचा उपक्रम; प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘संवाद दिन’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.