• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मिशन झिरो ड्रॉप आऊट: शाळाबाह्य बालकांच्या शिक्षण पुनः प्रारंभास प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
July 5, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, शिक्षण
Reading Time: 1 min read
98 1
0
Nima Arora
14
SHARES
704
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.५:  ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ अंतर्गत जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षणाद्वारे माहिती संकलित करुन शिक्षण थांबलेल्या या बालकांच्या शिक्षणाच्या पुनः प्रारंभास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.

मिशन झिरो ड्रॉप आऊट अंतर्गत दि.५ ते २० जुलै या कालावधीत शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण केले जाते. अशाप्रकारे शाळाबाह्य आढळलेल्या वा मध्येच शिक्षण थांबवलेल्या बालकांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात करण्यात येते. या मोहिमेच्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) वैशाली ठग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या श्रीमती के.डी. चव्हाण, तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणाबाबत समग्र शिक्षा जिल्ह्य समनव्यक आरती जाधव यांनी सादरीकरण केले. याद्वारे मिशन झिरो ड्रॉप आऊटची माहिती देण्यात आली. या सर्व्हेक्षणात वय वर्षे ६ ते १४ या वयोगटातील बालकांचे सर्व्हेक्षण होणार आहे. गाव, वाड्या आणि वस्त्यांमध्ये हे सर्व्हेक्षण होईल. शहरी भागातही झोपडपट्टी भागात सर्व्हेक्षण होईल. सर्व्हेक्षणासाठी पथके गठीत करण्यात आली असून सर्व्हेक्षणात आढळलेल्या मुलांना त्यांच्या वयाच्या समकक्ष वर्गात प्रवेश देऊन त्यांचा अभ्यास पुर्ण करुन घेण्यात येईल. सन २०२१-२२ मध्ये झालेल्या अशाच सर्व्हेक्षणात जिल्ह्यात १ली ते ४ थी मध्ये १८२ तर इयत्ता ५ वी ते ८वी मध्ये ६२ विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देऊन शिक्षणाचा पुनः प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांच्या सर्व्हेक्षणास आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या २० तारखेपर्यंत हे सर्व्हेक्षण सुरु राहणार असून या सर्व्हेक्षणानंतर आढळून आलेल्या शाळाबाह्य बालकांची माहिती व त्यांच्या शिक्षणासाठी करण्यात आलेले नियोजन याबाबतची माहिती सादर करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी अशा बालकांची संख्या जास्त असेल अशा बालकांसाठी नजिकची शाळा उपलब्ध करावी. त्यासाठी विटभट्टी मजूर, स्थलांतरीत मजूर अशा विविध घटकांतील कुटुंबांमध्ये सर्व्हेक्षणाद्वारे माहिती घ्या. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, नगरपालिका, मनपा प्रशासनानेही यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

Tags: Collector Nima AroraMission Zero Drop Out
Previous Post

Mumbai Rain Alert: रेल्वे सेवेला पावसाच्या फटक्यानंतर ‘या’ मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Next Post

मिशन वात्सल्य: ४० बालकांच्या शैक्षणिक खर्चासंदर्भातील प्रस्तावास मान्यता

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Nima Arora

मिशन वात्सल्य: ४० बालकांच्या शैक्षणिक खर्चासंदर्भातील प्रस्तावास मान्यता

Pandit Dindayal Upadhyay

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा शुक्रवारी (दि.८)

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.