अकोला- अकोट शहरातील शौकत अली चौकाजवळ लूडो जुगारावर पैसे लावून खेळणाऱ्यांवर छापा टाकून १२ आरोपींवर गुन्हा नोंद केला. तर ३ मोटरसायकल (किंमत १,२०,००० रुपये), १० मोबाइल -(किंमत ४६०००), नगदी ४६००० असा एकूण २,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाला शनिवारी, १८ जूनलाम मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अकोट शहरातील शौकत अली चौकासमोरील कमल टॉवर पार्किंगच्या बाजूला काही लोक लूडो जुगारावर पैसे लावून खेळत होते. यावरून दोन पंचासमक्ष छापा मारला असता १२ आरोपींजवळून ३ मोटारसायकल, १० मोबाइल व रोख रक्कम असा २,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अजहर सय्यद अब्बास, अब्दुल जुबेर अब्दुल साबिर अक्रम शाह अनवर शाह, शेख अख्तर शेख अयूब, मोहमद इब्राहिम मो. इमानुलहक, इरफान अली लियाकत अली, मो. वासिद मो. मुझफ्फर, रहमत अली यूनुस अली, रियाज अहमद शेख नूरा, अब्दुल जाकिर अब्दुल जलील, अब्दुल आरिफ अब्दुल कुद्दुस दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये अब्दुल जावेद अब्दुल रशीद, सय्यद
अकोट शहरातील शौकत अली चौकाजवळ लूडो जुगारावर पैसे लावून खेळणाऱ्यांवर छापा टाकून १२ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
अशा आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ ए अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने शनिवारी सायंकाळी ७ वाजता शौकत अली चौकात केली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.