• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

Our Media by Our Media
June 16, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
110 1
0
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
16
SHARES
793
VIEWS
FBWhatsappTelegram

अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती मान्सूनच्या सक्रिय होण्यातील अडथळे दूर करणारी ठरणार आहे. पश्चिमेकडून वाहणार्‍या वार्‍याचा वेगही वाढविण्यास मदत करणारी ठरणार असल्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार अरबी सागरात निर्माण झालेले अडथळे दूर झाल्यास मोसमी पाऊस येत्या दोन दिवसात सक्रिय होऊ शकतो. मान्सूनसाठी चांगले पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सून कोकणातील बहुतांश जिल्हे व्यापणार आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी झाल्यानंतर पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. सध्या मात्र मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या 48 तासात मान्सून कोकणात आगेकूच करील, असे आयएमडी’ने हवामान संदेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार पश्चिम किनार्‍यावरील कमी दाबाच्या पट्ट्याने आणि पश्चिमेकडील वार्‍यांच्या प्रभावामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याच्या प्रभावाने येत्या पाच दिवसात कोकणासह मुंबईतही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे.

या शिवाय शेजारील गोवा राज्यही यामध्ये व्याप्त राहणार असल्यामुळे हा आठवडा पावसाचा राहणार आहे. दरम्यान, दमदार पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर अनेक भागात पावसाने उघडीप दिली. बुधवारी जिल्ह्यात 0.78 मि. मी. च्या सरासरीने केवळ 7 मि. मी. एकूण पावसाची नोंद झाली. बुधवारी संपलेल्या 24 तासात पाच तालुक्यात पावसाची नोंंद झाली नाही तर उर्वरित तालुक्यात केवळ अपवादात्मक सरी झाल्या. यामुळे अजूनही शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Goaheavy rainsKokanmahrashtraMarathwada
Previous Post

आंतरराष्ट्रीय योग दिन; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे दि.21 रोजी मुख्य कार्यक्रम

Next Post

Farmer : शेतकऱ्यांनो…१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
FARMER

Farmer : शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

जनावरांचे व्यवस्थापन

विशेष लेखः पावसाळा आणि पाळीव जनावरांचे व्यवस्थापन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.