अकोट (देवानंद खिरकर) -: पो. स्टे. अकोट ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे,व स्टाफ आज दिनांक 03/06/2022 रोजी सकाळी पो. स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, शेख मुख्तार शेख गणी, रा. मोहाळा हा मोहाळा येथील त्याचे घरासमोर रस्त्यावर गोवंश मांसची विक्री करीत आहे. त्यावरून psi श्री पंचबुधे व स्टाफनी जाऊन शेख मुख्तार शेख गणी ह्याच्यावर रेड करून त्याचे ताब्यातून (1) 41 किलो 500 ग्राम गोवंश मांस किंमत 8300 रु. (2) लोखंडी वाजनकाटा किंमत 500 रु. (3) लोखंडी सुरा किंमत 100 रु, ( 4) लोखंडी कुऱ्हाड किंमत 100 रु असा 9,000 रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी अकोट रितू खोखर, पोलीस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे, पो. कॉ. उमेश चव्हाण, गोपाल जाधव, अमोल बुंदे, महिला पोलीस शिपाई अनिता सपकाळ ह्यांनी केली.