चोहोट्टा बाजार( पूर्णाजी खोडके)- अकोट तालुक्यातील बांबर्डा येथील बौद्ध समाजाचे रुस्तम सुर्यवंशी याचा मुलगा जानराव व विरोली जिल्हा गोंदिया येथील ओबीसी समाजाचे रोशन हजारे यांची मुलगी प्रेरणा यांचा आंतरजातीय विवाह दि. ३० मे २०२२ रोजी चौहोट्टा बाजार पोलिस चौकीत पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला आहे.
या विवाहाला पत्रकार दिपक सिरसाठ, गुणवंत सिरसाठ,संघपाल घनबहादुर,माणीक मोरे,गौतम ओवे, शांतशिल गवई, शेषराव गव्हादे, राहुल तेलगोटे, भाऊराव कांबळे, निलेश जामनिक,अंनता सिरसाठ, पत्रकार स्वप्नील सरकटे यांच्या उपस्थितीत सदर आंतरजातीय विवाह पार पडला.