अकोला दि.1– राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या,तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम याप्रमाणे :
- शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.
- सोमवार दि. 6 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे.
- मंगळवार दि. 7 जून रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.
- मंगळवार दि. 7 ते 10 जून 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे.
- बुधवार दि. 15 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप्राय देणे.
- शुक्रवार दि. 17 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस(नमुना अ) जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे.
- सोमवार दि. 20 जून रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला(नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.