अकोला,दि. 31- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे मंगळवार दि. 1 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि. 1 रोजी दुपारी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट येथे बियाणे महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी सहा वाजता अकोट येथून शासकीय वाहनाने कुरळपुर्णा निवासस्थानाकडे प्रयाण करतील.