तेल्हारा(प्रतिनिधी)– तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम भोकर येथे विद्युत रोहित्रावर काम करीत असताना २७ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज २९ मे ला घडली असून मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल गजानन परनाटे असे आहे या घटनेमुळे भोकर गावावर शोककळा पसरली आहे
प्राप्त माहितीनुसार ग्राम भोकर येथील विठ्ठल परनाटे हा २७ वर्षीय युवक गावात रोजगार म्हणून लाईनचे काम करीत असे आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान गावातील रोहित्रावर काम करीत असताना शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना घडली असून सदर युवक हा कोणाच्या म्हणण्यावरून सदर रोहित्रावर काम करण्यास गेला होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर काम हे महावितरण च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे असून अनेक ठिकाणी खाजगी इस्मानकडून कामे केली जातात.वरिष्ठ अधिकारी हे वीज बिलाची वसुलीची सक्ती कमचाऱ्यावर लादत असल्याने त्यांना फिल्ड वर काम करणे शक्य होत नाही त्यामुळे खाजगी मजुरांकडून काम करून घेतल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे यापूर्वीसुद्धा पाथर्डी येथील इस मोरे या युवकाचा सुद्धा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे मजुरा कडून काम करून घेत असताना कुठल्याही प्रकारची दक्षता घेतल्या जात नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत याला वरिष्ठ अधिकारी जबाबदार की लाईनमन असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सदर घटनेबाबत लिहीपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात गेली नव्हती परंतु पंचनामा झाल्यानंतर तक्रार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विठ्ठल परनाटे हा युवक भोकर गावांमध्ये नव्हे तर परिसरामध्ये कोणाच्याही हाकेला ओ देऊन त्यांचे काम पूर्णत्वास नेत होता गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे विठ्ठल आपल्या गावाला पाणी मिळावे याकरिता सदर रोहित्रा वर चढून झालेला बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असता लाईन बंद करण्यात आली असे त्यांला सांगितले गेल्यामुळे विठ्ठलने काम सूरु केले परंतु लाईन बंद झाली नव्हती त्यामुळे विठ्ठला आपला जीव गमवावा लागला या सर्व प्रकरणामुळे विठ्ठलने कुणाच्या म्हटल्याने काम केले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत विठ्ठल च्या अशा अचानक मृत्यूमुळे भोकर गावासह परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे ग्रामीण रुग्णालय येथे झाल्यानंतर २९ मे ला सायंकाळी विठ्ठल यांच्या वर शोकाकुल वातावरनात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.