अकोला दि.25 – केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरीता सहा सत्रामधील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. राज्यातून बरगढ (ओडीसा) करीता 13 अधिक 1, वेंकटगिरीसाठी 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज 10 जुन 2022 पर्यंत मागविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज 10 जुन 2022 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त, http.www.diretexmah.gov.in वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत, क्रमांक 2, 8 वा माळा, बि- विंग, सिव्हील लाईन, नागपूर 440001 या पत्त्यावर संपर्क करावा व अर्ज प्राप्त करून घ्यावी. तसेच 0712-2537927 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. तसेच अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे वस्त्रोद्योगाचे प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे.