• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्यमिता यात्रा अकोल्यात उद्योजकतेसाठी दृढनिश्चय आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

adil by adil
May 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, संपादकीय
Reading Time: 1 min read
84 1
0
उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबी
13
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला,दि.20 –   रोजगार व उद्योगनिर्मितीकरीता शासन विविध योजनांमधून कर्ज, अर्थसहाय्य देत असते. नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या नवउद्योजकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. गरज आहे ती उद्योजकतेसाठी आवश्यक असणाऱ्या दृढनिश्चयाची जोपासना करण्याची, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

            येथील श्री  शिवाजी कला,‍ वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय येथे उद्यमिता यात्रा व तीन दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटीयार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी  राजेंद्र हिवाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक निलेश निकम, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, उद्योजकता विकास प्रमुख  डॉ. अंजली कावरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष उन्‍मेश मालू,  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे  जिल्हा समन्वयक रोहित बारसकर, युथ एड फाऊंडेशन संस्थाचे अध्यक्ष मॅथ्यु मट्टम, उद्यमिता यात्राचे राज्य समन्वयक मनोज भोसले, दृष्टी फाऊंडेशनचे समन्वयक रोहन कासवे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, नवउद्योजक आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, आज अकोल्यात आलेल्या उद्यमिता यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण शिबिरामुळे मिळणाऱ्या मार्गदर्शनातून नवे उद्योजक तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच उद्योगासंडर्भात असलेल्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. त्याचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात उद्योग निर्मितीला पोषक वातावरण असून प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा. नव्या उद्योगाची सुरुवात करताना जिद्द, मेहनत, जोखीम व संयमता असणे आवश्यक आहे. केवळ स्थिरता असलेल्या रोजगाराकडे न बघता रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करा. शासनाकडून नवउद्योजक निर्मिती व्हावी याकरीता अनेक योजना व कर्जसुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेवून अकोला जिल्हा औद्योगिक शहर म्हणून नावलौकिकास येण्यास जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

             मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, सर्वांनी नोकरीकडे धाव न घेता उद्योग निर्माण होईल याकरीता प्रयत्न करावे. कौशल्य  विकास सोसायटी व युथ एड फाऊंडेशन संस्थाव्दारे जिल्ह्यातील नवउद्योजकांना नव्या संधी निर्माण व्हाव्या. तसेच उद्योगाबाबत मार्गदर्शनाकरीता तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी सौरभ कटीयार यांनी केले. युथ एड फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मॅथ्यु मट्टम यांनी ही यावेळी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, तीन दिवसीय  प्रशिक्षण शिबीरात युवकांचे समुपदेशन  करुन त्यांना स्वंयरोजगाराकरीता प्रेरीत करणे,  युवकांमधील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपचा विकास, सुक्ष्म व्यवसाय, लघुउद्योगांना चालना, शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  त्यांनी केले.

            प्रास्ताविक मनोज भोसले,सुत्रसंचालन सौरभ वाघोळे तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी केले.

Tags: AkoladeterminationentrepreneurshipEntrepreneurship YatraNima Arora
Previous Post

Pegasus : पेगासस चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ

Next Post

आता ओटीपी शिवाय SBI ATM मधून पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या नवा नियम आणि पैसे काढण्याची पद्धत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
SBI

आता ओटीपी शिवाय SBI ATM मधून पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या नवा नियम आणि पैसे काढण्याची पद्धत

rto-jayashri-dutonde

ई-वाहन खरेदी करतांना अधिकृत संस्थेचा मान्यता चाचणी अहवाल; परिवहन आयुक्तांची परवानगी असल्याची खात्री करा -उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.