• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
May 13, 2022
in Featured, अकोला, राजकारण
Reading Time: 1 min read
83 1
0
मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा
13
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.13: पावसाळ्यातील अतिवृष्टी, वादळ, विजा कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच आपत्ती दरम्यान व आपत्तीनंतर मदत व बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय, संपर्क राखावा व सतर्क राहून काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आज मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस उपअधीक्षक(गृह) शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुंगारतुषार वारे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी,  गटविकास अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनाशी संबंधित सर्व यंत्रणा उपस्थित होत्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यातील मान्सुन व त्याअनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यात माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात  जून ते सप्टेंबर या कालावधीत 693.7 मि.मी इतके पर्जन्यमान अपेक्षित असते. जिल्ह्यात्लगु, मध्यम व मोठे असे मिळून 38 प्रकल्प आहेत.  तथापि, अतिवृष्टी, नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होऊन मुख्य नद्यांमध्ये प्रवाह येणे, धरणे पूर्ण भरल्याने विसर्गामुळे पुर येणे यासारख्या कारणांमुळे पूरस्थिती  निर्माण होत असते. अशा स्थितींच्या वेळी सर्व यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा देणे, पूर बाधित गावांमध्ये मदत बचाव कार्याची सज्जता ठेवणे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे इ. उपाययोजना कराव्या,असे सांगण्यात आले. अशावेळी वीज पुरवठा खंडीत होत असतो, तो शक्य तितक्या लवकर पुर्ववत करण्यासाठी नियोजन करावे. वादळामुळे झाडे कोसळतात, त्यांना हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात एकूण 77 गावे  पूरबाधीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सर्व स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावा. तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षावरुन घडलेल्या आपत्तीची वा स्थितीची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात यावी. तसेच गावनिहाय तालुकास्तरावरुन आपत्तीत मदत करणाऱ्या व्यक्ति, संस्था यांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, जेणे करुन नियोजन शक्य होईल,असेही यावेळी सांगण्यात आले.

Tags: AkolaCollectorNima Arora
Previous Post

वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न; टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा

Next Post

शुटिंग,सायकलींग व अँथलेटिक्स खेळांसाठी निवड चाचणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Khelo India

शुटिंग,सायकलींग व अँथलेटिक्स खेळांसाठी निवड चाचणी

harbhara

हरभरा ऑनलाईन नोंदणीसाठी दि. 17 पर्यंत मुदत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.