• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढा- सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड

adil by adil
May 6, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, शिक्षण
Reading Time: 1 min read
88 0
0
MahaDBT-Scholarship
14
SHARES
632
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत द्यावयाच्या शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील नवीन अर्ज व अर्जांचे नुतनीकरण महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढणे व शुल्क मंजूर करण्याची कार्यवाही करावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडिबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, वि.जा., भ.ज.,  इमाव. व विशेष मागास प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविल्या जातात.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

 माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नविन व नुतनीकरणाचे वरील योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि.14 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वेळोवेळी शासनामार्फत शिष्यवृत्ती आवेदन पत्रे नोंदणीकृत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात अनु.जाती प्रवर्गातील 17542 तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 25867 आवेदन पत्रे नोंदणीकृत झालेली आहे.

नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील 13750 तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 21758 स्तरावरून निकाली काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही महाविद्यालयस्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील 1995 तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 2260 शिष्यवृत्ती आवेदनपत्रे असे 4255 आवेदन पत्रे विविध महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहे. याकरीता वेळोवेळी संबंधित महाविद्यालयांना विविध माध्यमांद्वारे सुचना देण्यात आल्या आहेत.

अमरावती येथील समाजकल्याण विभागाचे आयुक्त तसेच उपायुक्त यांनी घेतलेल्या आढावा बैठकमध्ये अकोला जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावरील अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. तथापि सर्व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/ कर्मचारी यांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी / तपासणी करून पात्र अर्ज जिल्हा कार्यालयाच्या लॉगइनवर पाठवावे. तसेच ज्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क अद्यापही मंजूर नाही अशा महाविद्यालयांनी शुल्क मंजूरीची कार्यवाही जलद गतीने करावी जेणेकरून पात्र अर्ज जिल्हा कार्यालयाच्या लॉगइनवर पाठविणे सोयीचे होईल व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असे समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

दि.5 मे 2022 अखेर महाडीबीटी पोर्टल डॅशबोर्डनुसार सामाजिक न्याय विभागाचे योजनानिहाय महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज संख्या याप्रमाणे-

श्री. संत गजानन महाराज आर्टस कॉलेज-43, श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजी -58, गर्व्हरमेंट इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्युट – 144, गर्व्हरमेंट आयटीआय -49, डॉ. वंदनाताई ढोणे नर्सिंग स्कुल – 60, महर्षी वाल्मिकी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग मलकापूर -80, ऐंजल ऑफ मरसी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग सायन्स -42, आकांक्षा सोशलफेअर ॲण्ड एचआरडीए इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन – 135, श्री गाडगे महाराज कॉलेज मुर्तीजापूर -40, श्रीमती. पी.डी. पाटील सोशल वर्क कॉलेज खडकी -78

Tags: collegeDr. anita RathodMahaDBT system
Previous Post

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा: 113 पदांसाठी रविवारी निवड प्रक्रिया

Next Post

विद्यापीठांतील परीक्षांचा आढावा घेणार – उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
uday-samant

विद्यापीठांतील परीक्षांचा आढावा घेणार - उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत

PUBJI

पबजीच्या नादात रेल्वेने अल्पवयीन मुलगा नाशिकरोडला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.