अकोला दि.2: जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
प्रभाग रचना करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीचा तालुकानिहाय तपशील खालील प्रमाणे-
अ.क्र. | तालूक्याचे नाव | ग्रामपंचायतींची संख्या |
1 | तेल्हारा | 23 |
2 | अकोट | 44 |
3 | मुर्तिजापूर | 51 |
4 | अकोला | 54 |
5 | बाळापूर | 27 |
6 | बार्शिटाकळी | 47 |
7 | पातूर | 28 |
एकूण | 274 |
प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रभाग रचना करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला दि.6 जून 2022 रोजी प्रसिद्धी देण्यात येईल त्यावर दि.14 जून 2022 पर्यंत संबंधीत तहसिलदार यांच्याकडे हरकती दाखल करता येतील. प्राप्त हरकतीवर निर्णय घेवून दि. 05 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./जि.प./पं.स.निवडणुक विभाग अकोला संजय खडसे यांनी कळविले आहे.