अकोला– अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे शेख सलीम किराणा शॉप, चोहट्टा बाजार ता.अकोट येथे लेबल दोष व पॅकेज ड्रिकींग वॉटरमध्ये भेसळ होत असल्याचे माहिती मिळाली.
याआधारावर शेख सलीम किराणा शॉपवर अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी दुकानाची तपासणी करून पॅकेज ड्रिकींग वॉटर(ओरेण ब्रॅण्ड) एक लिटरच्या पॅक बॉटल व पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्ड ) 500 मिलीच्या 688 पॅकबंद बॉटल या पाण्याचे नमुने लेबल दोष व भेसळीच्या संशयावरून विश्लेषणा करीता घेतले व उर्वरित साठा पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्ड) एक लिटरच्या 80 पॅक बंद बॉटल किंमत 1 हजार 600 रुपये व पॅकेज ड्रिकींग वॉटर (ओरेण ब्रॅण्ड) 500 मिलीच्या 688 पॅक बंद बॉटल किंमत 6 हजार 880 असा एकुण किंमत 8 हजार 480 रुपयेचा साठा जप्त केला. दोन्ही नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविले असुन विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील करण्यात येईल. ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व स्टाफ नमुना सहायक भिमराव नरवणे यांच्या उपस्थितीत झाली.