अकोला– राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींकरीता दि. 25 ते 2 मे दरम्यान जंतनाशक गोळया वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच शाळाबाह्य बालकांना जंतनाशक गोळया वितरीत करण्याकरीता आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला बालविकास विभाग यांनी समन्वय साधून मोहिम यशस्वीपणे राबवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.
अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेबाबतचे आढावा घेतला. यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मनिष शर्मा, महिला व बाल विकास विभागाचे जी.रहान अहमद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष ठाकरे, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी साजिया हक, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे मिनाक्षी पुखट, एन.एस.किरडे आदि उपस्थित होते.
आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी निर्देश दिले की, राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळया वितरीत करावयाचे असल्याने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दि.25 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याबाबत शिक्षण विभागाने निर्देशीत करावे. तसेच ज्यांचे काही कारणास्तव जंतनाशक गोळया वितरीत होवू शकले नाही त्यांनी शुक्रवार दि.29 रोजी उपस्थित राहावे. शाळाबाह्य बालकांकरीता प्राथमिक आरोग्य विभाग, आशासेविका यांनी घरोघरी जावून जंतनाशक गोळया वितरीत कराव्या. याकरीता महानगरपालिका व महिला व बाल विकास विभागाने समन्वय साधून मोहिम यशस्वी राबवावी, असेही निर्देश यावेळी दिले.