अकोला – कोरोना काळात इंडियन रेड क्रॉस संस्थेच्या माध्यमातून होमिओपॅथिक डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक औषधांचे वितरण केले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे नागरिकांना फायदा झाला. भविष्यातही शासन व संस्थेला मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
होमीओपॅथीचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त शहरातील होमिओपॅथिक तज्ञांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जागतिक होमिओपॅथिक दिवस उत्सव समिती तर्फे आयोजित सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर किशोर मालोकार, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चे अध्यक्ष डॉ. तिलक राज सरनाईक, अकोला होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय तिवारी डॉ. सौ. योगिता चव्हाण डॉ. सत्यजित कुचर डॉ. अमोल कुचर, डॉ. सौ. कल्पना धोटे, डॉ. शिवशंकर मौर्य, राजा होमिओ फार्मसी, अमित होमिओ फार्मसी न्यू होमिओ फार्मसी आणि डॉक्टर संदीप चव्हाण यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी निमा अरोरा यांच्या हस्ते डॉक्टर हार्निमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक डॉ किशोर मालोकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन इंडियन रेडक्रॉस चे मानद सचिव प्रभजित सिंह बछेर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संदीप चव्हाण यांनी केले.