अकोट(देवानंद खिरकर)- पूर्णा अकोला रेल्वेगाडी अकोट पर्यंत सुरू करणे पुर्णा ते खंडवा या रेल्वे मार्गाचे अकोला जिल्ह्यातील अकोट पर्यंत ब्राँडगेज आपल्या कार्यकाळात पुर्ण झाले आहे.अकोटला रेल्वे स्थानकाचे उभारणीचे इमारतीचे काम पूर्णपणे झाले अकोट-अकोला राज्य महामार्गावर ब्रॉडगेज रुळावर रेल्वे उड्डाण पुल बांधकाम पुर्ण झाले. वाहतूक करीता पुल सुरु झाला.
रेल्वे प्रशासनाने रेल्वेरुळ चाचणी घेतली. रेल्वे चालवुन सर्व तांत्रिक बाबीची पळताळणी कडून crs प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त केल्याची माहीती आहे.सध्या एसटी संप, बाजारात शेतकऱ्यांचे मालधान्याची आवक पाहता निर्यात-आयातवर परीणाम होत आहे. तरीपण अकोटला रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही. अकोट-खंडवा रेल्वे मार्ग अपुर्ण आहे.पंरतु पुर्णा- अकोला- अकोट रेव्वेलाईन सुसज्ज आहे. अकोट परिसराशी जोडलेल्या बहुतांश गावातील प्रवासी नागरिक, व्यापारीसाठी रेल्वे प्रवास सुरक्षित आहे.त्यामुळे आपल्या पुढाकारातून अकोटमधील रखडलेली रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे आपणास करीत आहो.प्रहारचे कार्यकर्ते विशाल भगत,आकाश निंबोळकर, प्रतिक भगत उपस्तिथ होते.