अकोला: मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता अकोला जिल्हयात प्रत्येक आठवडयामध्ये प्रत्येक विभागातील एका पोलीस स्टेशनची निवडकरून त्या ठिकाणी कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात येते. त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांचे आदेशान्वये अकोट विभागातील पोस्टे दहीहांडा येथे सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग श्रीमती रितु खोखर यांनी दि. २२.०३.२२ रोजीचे रात्री दरम्यान कॉम्बींग ऑपरेशनचे आयोजन केले होते. नमुद कॉम्बींग ऑपरेशन करीता अकोट विभागामधील पोस्टे अकोट शहर, अकोट ग्रामीण, दहीहांडा, तेल्हारा, हिवरखेड येथील अधिकारी व कर्मचारी असे एकुन ०३ अधिकारी व ३२ कर्मचारी यांनी सहभाग घेवुन कॉम्बींग ऑपरेशनमध्ये पुढील प्रमाणे कारवाई केली १) नाकाबंदी करून संशयीत १७ वाहने चेक केली आहेत २) मालमत्तेचे गुन्हे करणारे गुन्हेगार राहत असलेले ०३ गुन्हेगार ०३ गुन्हेगार लोकांच्या घरझडत्या घेण्यात आल्या आहेत. ३) आर्म अॅक्ट प्रमाणे ०१ कारवाई करण्यात आली ४) कॉम्बीग ऑपरेशमध्ये ०७ समन्स ०१ पकड वॉरंन्ट व ०२ जमानती वॉरन्टची बजावणी केली ५) रेकॉर्ड वरील ०७ गुन्हेगार व ०१ निगराणी बदमाश यांना चेक केले. ७) कलम १२२ प्रमाणे ०१ कारवाई व कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे ०३ कारवाई करण्यात आली आहे. तसेच कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान जुगार कायदयान्वये ०२ व दारुबंदी कायदयान्यये ०२ कारवाई करण्यात आली आहे.
कॉम्बींग ऑपरेशन यशस्वी होण्याकरीता श्रीमती रितु खोखर सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग यांनी स्वःता सहभाग घेतला. तसेच मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी. या करीता यापुढे सुध्दा अकोला जिल्हयातील इतर उपविभागामध्ये कॉम्बींग ऑपरेशनचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदरचे कॉम्बींग ऑपरेशन हे मा. श्री जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. श्रीमती मोनिका राउत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती रितु खोखर सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग व अकोट विभागातील सर्व पोस्टेचे अधिकारी व कर्मचारी यांनी राबविले आहे.