अकोला- दिनांक २१.०३.२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन पो. स्टाप व पंचासह ग्राम पाटखेड ता. बार्शिटाकळी जि. अकोला येथे जावुन छापा कारवाई केली असता छापा कारवाई दरम्यान आरोपी सचिन रमेश महाजन वय २७ वर्षे रा. पाटखेड ता. बार्शिटाकळी जिल्हा अकोला याचे शेता मधुन ४०५ नग हिरव्या गांजाचे झाडे एकुण ६२ किलो ८५० ग्रॅम गांजाची झाडे किंमत १,१८,५५०/-रु मिळुन आल्याने राजपत्रीत अधीकारी आर. जी. डाबेराव नायब तहसिलदार बार्शिटाकळी व पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतला.
वरील प्रमाणे ग्राम पाटखेड ता. बार्शिटाकळी येथील छापा कारवाई दरम्यान व आरोपी सचिन रमेश महाजन यांचे शेतामधुन मध्ये एकुण ४०५ नग गांजाचे झाडे ६२ किलो ८५० ग्रॅम गांजाची झाडे किंमत ०१, १८,५५०/- रु चा मिळुन आल्याने आरोपी सचिन रमेश महाजन वय २७ वर्षे रा. पाटखेड ता. बार्शिटाकळी जिल्हा अकोला यांचे विरुद्ध पो.स्टे. बार्शिटाकळी येथे अप क्र. १५७ / २०२२ कलम २० (अ) (ब) एन.डी. पी. एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री जी. श्रीधर पोलीस अधीक्षक, अकोला, मा. श्रीमती मोनिका राउत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संतोष महल्ले, पोउपनि, मुकुंद देशमुख, ए. एस. आय ठाकुर, पोहवा. गणेश पांडे, दत्तात्रय ढोरे, नापोकों चव्हाण, पोकॉ रवि पालीवाल, श्रीकांत पातोंड, संदीप ताले, मपोहवा टेकाम चालक पोकॉ अक्षय बोबडे यांनी केली आहे.